अहमदनगर जिल्ह्यातील या गावात लॉकडाऊन केल्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण !

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- कोरोना रुग्णांची संख्या राज्यात कमी झाली असून कडक लॉकडाऊन व कडक निर्बंध आता या पुढे लावण्यात येऊ नये, लॉकडऊनमुळे गावातील छोट्या छोट्या व्यावसायिकांना आता सनासुदीच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली.

प्रशासनाने काष्टी गावात दहा दिवसासाठी केलेले लाॕकडाऊन हे अन्यायकारक आहे. ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्णय घेऊन शिथिल करावे, या मागणीसाठी काष्टी गावातील संपूर्ण व्यापारी संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसीलसमोर समोर उपोषण सुरू केले. काष्टीमध्ये ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर असे १० दिवस लॉकडऊन आहे.

अप्पर तहसीलदार चारूशिला पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, विठ्ठलराव काकडे यांनी आंदोलकांची भेट देऊन प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना बोलावून घेतले.

नागरिकांचे समाधान झाल्यावर उपोषण सोडण्यात आले. यावेळी कैलास पाचपुते, वैभव पाचपुते, सरपंच सुनील पाचपुते, बंडूशेठ जगताप, राकेश पाचपुते, संजय काळे, किशोर भोगावत, महेश कटारिया, अनिल शेलार आदी उपस्थित होते.