अहमदनगर पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ग्रामस्थ करणार ‘आंदोलन’

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पुणे महामार्गावर अपघातग्रस्त क्षेत्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे सापळा बनले असून, नारायणगव्हाण येथे रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवार, (दि. २) जानेवारी २०२४ रोजी गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नगर – पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील अपघातग्रस्त क्षेत्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे सापळा बनले असून, येथील रस्त्याचे प्रलंबित चौपदरीकरण व महामार्गावर वाहनांची वाढलेली संख्या,

यामुळे येथे वारंवार अपघातांची सुरू असलेली जीवघेणी मालिका थांबवण्यासाठी चौपदरीकरणाच्या पूर्णत्वासाठी ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाला गाव बंद व रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन दिले होते.

त्यावर प्रशासनाने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने दि. २ जानेवारी २०२४ रोजी ग्रामस्थांच्या वतीने गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. नारायणगव्हाणकरांसह विविध सामाजिक संघटनांनी महामार्गावर आंदोलने केली,

त्यामुळे गावातील ९४५ पैकी ८१५ मीटर काम पूर्ण झाले तरी अंदाजे १३० मीटर काम अद्याप बाकी असून, हे काम पूर्ण करण्यासाठी मंगळवारी रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe