अहमदनगरमध्ये अवजड वाहतुक नियमांचे उल्लंघन; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar news :-शहरामध्ये अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे ही अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्या संदर्भात लेखी स्वरूपामध्ये आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिलेल्या आहेत.

दरम्यान शहरामध्ये अवजड वाहतुकीच्या संदर्भामध्ये जे नियम आखून दिलेले आहेत त्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

विळद घाट, नगर-पुणे महामार्गावर केडगाव आणि सोलापूर महामार्गावर काही पॉईंट निश्चित करण्यात आलेले आहे. या ठिकाणावरून वाहतूक वळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

असे असताना देखील नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यातच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.

या अगोदर अनेक वेळेला लहान-मोठे अपघात सुद्धा झालेले आहे. वास्तविक पाहता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन देखील त्याची काही ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

शहरामध्ये अवजड वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच होत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवजड वाहतुकीच्या संदर्भातमध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत, लेखी आदेश काढले आहेत,

जर त्याची अंमलबजावणी होणार नसेल तर निश्चितपणे संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच वाहतूक समस्येचा आढावा प्रत्यक्ष पुन्हा आपण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe