अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याशी संबंधीत वेगवेगळ्या ऑडिओ क्लीप समोर येत आहेत. यामुळे नेवासा पोलीस ठाणे बदनाम झाले आहे.
यातच आता एक पोलीस कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशलवर चांगलीच व्हायरल झाली आहे.
दरम्यान हि क्लिप नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणार्या एका पोलीस कर्मचार्याच्या संभाषणाची असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे.
पोलीस कर्मचारी व अपर पोलीस अधीक्षक यांच्यातील हप्तेखोरीचे संभाषण, यानंतर पोलीस निरीक्षकाचे वाळूतस्कराशी झालेले संभाषण चांगलेच व्हायरल झाले होते.
आता नेवासा वाहतूक शाखेत ड्युटी करत असलेला पोलीस कर्मचारी वाहन चालकाशी समोरासमोर बोलत असल्याचे संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
हा वाहन चालक प्रवासी संघटनेचा पदाधिकारी आहे. या संभाषणातून वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड झाली आहे. त्याचबरोबर कायद्याचे रक्षक असलेल्या
पोलीस कर्मचार्याकडून अॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी दिली जात असल्याचे यातून समोर आले आहे. अवैध प्रवासी वाहतूक व यातून पोलिसांना दिले जाणारे हप्ते या संभाषणातून अधोरेखित झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम