अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे मोफत दर्शन होणार असून, महापालिकेच्या वतीने मोफत बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासाठीचा महापालिकेचा हा पहिलाच उपक्रम असून येत्या पर्यटन दिनी म्हणजेच सोमवारपासून ही मोफत बससेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली आहे.
महापालिकेचे प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नगर शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शहरापासून जवळ अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.
पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवळ आहे. पर्यटनस्थळी सध्या चांगलीच गर्दी होत आहे. पार्श्वभूमीवर नगरच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी महापालिकेच्यावतीने मोफत सेवा सुरू करण्यात येत आहे. नगर शहर व परिसरातील काही पर्यटनस्थळे…
भुईकोट किल्ला, दमडी मज्जिद, बागरोजा हडको, भिस्तबाग महल, फर्याबाग, चांदबीबी महल, पिंपळगाव माळवी तलाव, मेहरबाबा ट्रस्ट आदी पर्यटनस्थळे आहेत.
या दिवशी असणार मोफत बससेवा… ही बससेवा शनिवार व रविवार, या सुटीच्या दिवशी उपलब्ध असणार आहे. प्रयोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास भविष्यातही ही सेवा सुरू ठेवली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम