नगर जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासू देणार नाही, विवेक कोल्हे यांचे आश्वासन !

Ahmednagarlive24 office
Published:
vivek kolhe

कोपरगावचे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासाला प्राधान्य दिले. तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खताचा तुटवडा भासू देणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन इफकोचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील कोपरगाव, शिंगणापूर रेल्वेस्टेशन येथे १२ वर्षापासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईट नुकताच नव्याने सुरू करण्यात आला. त्याची विधीवत पूजा संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते काल सोमवारी (दि.८) पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी स्वागत केले. यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी शेतकरी बांधवाना सातत्याने जाणवणारा इफको खताचा तुटवडा लक्षात घेवून कोपरगाव येथे सन २००७ मध्ये रॅक सुरू केला होता.

मध्यंतरीच्या कालखंडात तो बंद पडला. त्यामुळे आपली गैरसोय झाली. तो पुर्ववत सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले. सहकाराच्या माध्यमांतून शेतकऱ्यांसह परिसराची सर्वांगिण प्रगती करायची हा वसा घेत आपलेही कार्य सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी गावपातळीवरील सोसायट्या पुन्हा सक्षम व्हाव्यात, म्हणून त्याअंतर्गत शाश्वत रोजगारात वाढ करत विविध ३०० प्रकारच्या सेवा व्यवसायाचा त्यात समावेश केला. ही मोठी उपलब्धी आहे.

प्रास्ताविकात जिल्हा इफको क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई म्हणाले की, इफकोचे नवनिर्वाचित संचालक कोल्हे यांनी संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत कोपरगाव खत रैंक पॉईंट सुरू करून शेतकरी अपघात विमा संरक्षक रक्कमेत दुपटीने वाढ करून ती २ लाख रूपये वाढविण्यास मंजुरी घेतली आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेव वक्ते, ज्ञानदेव औताडे, निवृत्ती बनकर, शिवाजीराव वक्ते, मच्छिद्र लोणारी, सतिष आव्हाड, बापूराव बारहाते, राजेंद्र भाकरे, बबनराव निकम, रामदास शिंदे, नानासाहेब होन, राजेंद्र लोणारी, सरपंच विजय काळे, कैलास संवत्सरकर, उपसरपंच शाम संवत्सकर, मच्छिद्र लोणारी, नानासाहेब थोरात, कामगार युनियनचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, विजय काळे, मुकुंद काळे, श्री रूपनर, विठ्ठल कोल्हे, भागिनाथ लोंढे, चंद्रकांत देवकर, संभाजीराव बोरनारे, स्टेशन मॅनेजर बी.एस. प्रसाद, हरिभाऊ गोरे हजर होते. इफकोचे क्षेत्र अधिकारी तुषार गोरड यांनी सूत्रसंचालन केले. तर भाऊसाहेब वाघ यांनी आभार मानले.

कोपरगावात खत रॅक पॉईंट सुरु

शेतकऱ्यांनी इफकोद्वारे खरेदी केलेल्या नॅनो युरिया आणि खाद यावर अपघात विमा पूर्वी पेक्षा दुप्पट करण्यात आला आहे. प्रत्येकी २ लाखापर्यंत कमाल मर्यादा असलेला अपघात विमा खाद खरेदीवर मिळणार आहे. त्यासाठी केवळ खरेदी पावती जपून ठेवावी लागणार आहे. यासह शेतकऱ्यांनी ऑपरेशन अथवा गंभीर आजारावर उपचार करता किसान फंडाद्वारे वैद्यकीय मदत २५ हजार पर्यंत मिळण्यासाठी माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe