मासे खाण्यापूर्वी थोडं थांबा; तुम्ही खात असलेले मासे विषारी तर नाहीत ना? कारण ‘या’ धरणातच विषारी पदार्थ टाकून केली जातेय मासेमारी

Published on -

अहिल्यानगर : मासे हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे मासे न खाणारा बहुतेक सापडणार नाही मात्र तुम्ही खात असलेले मासे हे विषारी तर नाहीत ना याची खात्री करा.हो तुम्ही बरोबर वाचले आहे.कारण श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील घोड धरणाच्या जलाशयामध्ये काही मासेमारी करणारे व्यावसायिक थेट या पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असल्याचे या धरणाचे व्यवस्थापक शांताराम शितोळे यांनी सांगितले आहे.याप्रकरणी त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रारी अर्ज दिला आहे.

त्यामध्ये त्यांनी काही संशयित यांची नावे दिली आहेत तसेच मरण पावलेले मासे तसेच परिसरामध्ये सापडलेले औषधे व केमिकलच्या बाटल्या यांचे फोटो पुरावा म्हणून सादर केले आहेत.त्यामुळे या प्रकाराला दुजोरा मिळत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा व शिरूर तालुक्याच्या सीमेवरील घोडनदी वरती असणाऱ्या घोड धरणामध्ये काही दिवसांपासून मासेमारी करणारे व्यावसायिक कोणतीही परवानगी न घेता पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असून ते मासे परस्पर विक्री करत असल्याचे निदर्शनात आले आहे.

विषारी औषध व केमिकल पाण्यात मिसळून नंतर मृत झळले व नंतर पकडलेले मासे हे मानवी शरीरासाठी हानिकारक आहेत, त्यामुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो तसेच पाण्यामध्ये विषाचे प्रमाण वाढवून भविष्यामध्ये शेतीला व जलचर प्राणी, पक्षी यांना धोका निर्माण होऊ शकतो. अशी अनैसर्गिक पद्धतीने मासे पकडणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.तसेच असे मासे खाणे देखील हानिकारक आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe