थोडं थांबा..दिवाळीत गोड बातमी मिळेल!

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीत राज्यात गोड बातमी मिळेल. थोड थांबा सबुरीने घ्या असा सल्ला देत, आपले सरकार आल्यावर ग्रामिण भागातील रस्ते करु. कोरोनामुळे खासदारांना निधी नाही.

लसीकरण, आरोग्याच्या सुविधासाठी व मोफत धान्य वाटपासाठी निधी खर्च करावा लागला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात गरीबांना साथ देण्यासाठीच्या विविध योजना राबविल्या आहेत.

त्यांचा प्रचार व प्रसार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी चिंचपुर पांगुळचे सरपंच धनंजय बडे यांनी परीसरातील पाच गावांच्या वतीने चिचंपुर इजदे ते पांढरवाडी फाटा या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याची मागणी केली.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्य़ा, कोरोनामुळे विकासाच्या कामासाठीचा निधी वळविला गेला. विरोधी आमदारांना तर निधी कमी देण्यात येतो. केंद्रातील सरकारने सामान्य माणसासाठी विविध योजना राबविल्या.

अतिवृष्टीतील शेतक-यांना नुकसानीची भरपाई सरकार देईना.शेतक-यांसाठी आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल. शेतक-यांना मदत मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.

प्रस्ताविक शिवाजी महाराज गरड यांनी केले. सुत्रसंचालन आदिनाथ बडे यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ बडे यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe