पाणलोटासह लाभक्षेत्रात पावसाची प्रतिक्षा, कोपरगावला १२ दिवसाआड पाणी, दारणा धरणात ५६ टक्के पाणी !

Ahmednagarlive24 office
Published:
darana

कोपरगाव गेल्या २ महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ७ टीएमसी क्षमतेचे दारणा धरण अवघे ४ टीएमसी इतके भरले आहे. त्यात ५६ टक्के पाणी साठा तयार झाला.

पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या धरणात ऑगस्ट उजाडला तरी जेमतेम पाण्याचा साठा आहे. त्यामुळे हजारो शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि.२१) जुलै पर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मिली मिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहेत. कंसातील आकडे एकुण पावसाचे आहेत.

दारणा ११ (४०१), गंगापूर २५ (४३१), ईगतपूरी ६८ (५०२), त्र्यंबकेश्वर १३ (६३८), नाशिक १० (२९१), नांदूर मध्यमेश्वर ३ (१३४), देवगाव ० (२३२), ब्राम्हणगाव ० (३६५), कोपरगाव ३ (१९४), पढेगाव (२५), सोमठाणे (२०९), कोळगाव ०२ (३६), सोनेवाडी (१४३), शिर्डी (२१६), राहाता (१५५) रांजणगाव खुर्द (१९५), चितळी ० (१६६), तर धरण कार्यक्षेत्रात वाकी ३१ (७२९), भाम ९४ (१०९८), भावली ६२ (१४३२), वालदेवी० (२६१), काश्यपी १२ (३७८), गौतमी १९ (४०९), काडवा ८ (२११), आळंदी १ (२०३), पालखेड ६० (३१०), वाघाड २७ (१९३), मुकणे १४ (४९५), पुनेगाव ० (१६८), वालदेवी (१६१), याप्रमाणे पाऊस झाला आहे. तर दारणेत ५६ टक्के (४००८ दलघफु), गंगापूर ३३ टक्के (१९०६ दलघफु), मुकणे १७ टक्के (५२५६ दलघफु), भावली १०० टक्के (१०८५ दलघफु), काश्यपी १० टक्के (२३२ दलघफु), वालदेवी २७ टक्के (३०६ दलघफु), पालखेड १३ टक्के (८७ दलघफु), असा धरणात पाणीसाठा आहे.

शेतकऱ्यांना वरदान असलेल्या धरणात अद्यापही पुरेसा पाण्याचा साठा नाही, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न भयाण आहे. त्यामुळे एकुणच सगळी परिस्थिती विचित्र निर्माण झाली आहे. दमदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील पशुधन जगवण्याची चिंता पडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe