२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अटीतटीच्या प्रसंगात रणधुनीत भारतीय जवानांनी शिस्तबद्ध धाडसी चढाई केली.सोबत टी- ९०, अर्जुन रणगाडे अन् वायुदलाच्या सहभागातून झालेल्या युद्ध सरावात आगीचे लोळ उठले.कानठळ्या बसवगारे आवाज अन् भारतीय स्वार्म ड्रोनच्या थव्यांनी लक्ष वेधून घेतले.तासाभरातच शत्रुची सर्व ठिकाणे ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश मिळाले, केके रेंजवर, रणभूमीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक शस्त्रांसह वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
भारतीय मैकनाईन्ड सेनेच्या युद्ध क्षमता व आधुनिक युद्ध सामग्री व तंत्रज्ञानाचा सरावात वापर करण्यात आला.सोमवारी सकाळी दहा वाजता,मेजर जनरल विक्रम वर्मा यांच्या उपस्थितीत युद्ध सरावाला सुरुवात झाली.
कानठळ्या बसवणारे आवाज अन् आग ओकणाऱ्या रणगाड्यांनी काळजाचा थरकाप उडवला, त्याचवेळी अर्जुन, भिष्म, टी-१०, टी-७२ रणगाड्यांनी प्रत्यक्ष मैदानावर धावताना दोन ते तीन हजार मिटरवरून अधिक दूरचे लक्ष नष्ट केले.त्याचवेळी दोन ते पाच हजार मीटरपर्यंत रेंज असलेल्या कॉम्बॅक्ट बेहिकलो अचूक मारा सुरू ठेवला.
रणगाड्यांच्या समुहाने एकाचवेळी चढाई केली, त्यावेळी शत्रुची निश्चित केलेल्या ठिकाणांवर धूर आणि आगीचे लोळ पहायला मिळाले.घण घोर युद्ध सुरू असतानाच चिता हेलिकॉफ्टरने शत्रुच्या बंकर जवळ स्पेशल फोर्सच्या जवानांना उतरवले.
या जवानांनी बंकरमध्ये प्रवेश केल्याचे प्रात्यक्षिक दाखवले, त्याचवेळी रणभूमीवर सुखोई ३० विमानांनी प्रवेश करून शत्रुना घड़की भरवली. स्वार्म ड्रोनच्या बॉम्बने,एकाच वेळी शत्रुच्या ठिकाणावर जाऊन, स्फोटके डागली.
देश विदेशातील अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी
एसीसी अँड एस आणि एमआयआरसी यांच्या संयुक्त विद्यामाने ही प्रात्यक्षिके झाली.देशभरातील अधिकारी, प्रशिक्षणार्थी व परदेशातील अधिकारी उपस्थित होते, त्यांनी मैकनाईन्ड इन्फंट्रीची सक्षमता पाहिली.या सरावात विविध दलाची साधने व साहित्याचा वापर करण्यात आला – विक्रम वर्मा, मेजर जनरल
मित्र राष्ट्रांच्या सैनिकांनी पाहिला थरार
युद्ध सराव पाहण्यासाठी मित्र राष्ट्रांचे सैन्य दलातील प्रतिनिधी उपस्थिती होते.त्यात प्रामुख्याने नेपाळ, सौदी आदी देशांचे जवान उपस्थित होते.यावेळी वापर केल्या जाणाऱ्या तोफ गोळे तसेच स्फोटकांचे विविध प्रकार प्रदर्शनात दाखवण्यात आले. रॉकेट लाँचर, त्याचबरोबर ड्रोनचे विविध प्रकार व वापर आदी माहिती देण्यात आली.
लवकरच ४५ किमी रेंजची माउंटेन गन उतरणार
मैदानात डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या माउंटेन गन सिस्टिम (९एमएम) प्रदर्शनात ठेवण्यात आली होती,हि गन सिस्टिम ४५ किलोमिटर पर्यंत फायर करण्यात सक्षम आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली ही सिस्टम सध्या ट्रायल बेसवर आहे.पुढील एक ते दोन वर्षांत ही सिस्टम लष्करी ताफ्यात सहभागी होईल.