वॉचमनचे हात-पाय बांधून पळविली ७ लाखांची कॉपर वायर ! दिघोळ फाटा येथील घटना; आतंरजिल्हा टोळी जेरबंद, खर्डा पोलिसांची कामगिरी

Published on -

५ फेब्रुवारी २०२५ खर्डा : जामखेड तालुक्यातील दिघोळ फाटा येथील पॉवर प्रा. लि. या सोलर कंपनीच्या वॉचमनचे हात-पाय बांधून व मारहाण करुन कंपनीतील सुमारे ६ लाख ७५ हजार रुपयांची कॉपर वायर ५ ते ६ चोरट्यांनी पळविली होती. यातील ५ आरोपीना खर्डा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल व एक पिकअप असा सुमारे ९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

१७ फेब्रुवारी रोजी पॉवर प्रा. लि. या सोलर कंपनीमध्ये पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ चोरटे आले व त्यांनी तेथील वॉचमनला पाठीमागून येऊन लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याचे हातपाय चांधून मोबाईल फेकून दिले. त्यानंतर पीकअप गाडी बोलावून त्यामध्ये कंपनीतील सुमारे ६ लाख ७५ हजार रूपये किंमतीची विध्य टेलीलिंक्स कंपनीची अंदाजे २७ हजार मीटर लांबीची एकूण २७ ड्रम (रोल) कॉपर वायर चोरुन नेली.

याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय झंजाड हे करत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांनी दोन पथके तयार करुन तपासाचे चक्र फिरवत घटनास्थळ ते अहिल्यानगर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन पिकअप (क्र. एमएच ४८, सीत्री-२४५८) निष्पन्न झाले.

त्यानंतर या वाहनावरील चालक आरोपी अनिलकुमार रामावत प्रजापती (वय ३०, रा. एकमा, पोस्ट- गंगावली ता. खलीलाबाद जिल्हा संतकबीरनगर, उत्तर प्रदेश ह.रा. खाडी नंबर-३, ९० फुट रोड, एल.बी.एस. नगर, साकीनाका, मुंबई उपनगर) यास साकीनाका येथून ताब्यात घेण्यात आले.

त्याचेवळी पोलिस कॉन्स्टेबल विष्णु आवारे यांना या गुन्ह्यातील आरोपी हे चोरी करण्याच्या उद्देशाने धानोरा (ता. आष्टी, जि बीड) रोडने जामखेडच्या दिशेने येत आहेत,अशी माहिती मिळाल्याने खडां पोलिस व जामखेड पोलिसांच्या २८/०२/२०२५ रोजी ५ जणांना ताब्यात घेतले.सागर गोरक्ष मांजरे (रा. अहिल्यानगर), वाहिद काहीद खान (रा. आंबावली, ठाणे), सिराज मियाज अहमद (रा. आंबवली, ठाणे) व १ विधिसंघर्षित बालक (रा. आंबीवली, ठाणे) यांना ताब्यात घेत तिघांना अटक केली तर विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी सागर मांजरे हा सराईत गुन्हेगार असुन त्यावर अहिल्यानगर जिल्हामध्ये एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून दरोड्यातील चोरी गेलेला माल व एक पिकअप टेम्पो असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तीन आरोपी पसार

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून या गुन्ह्यात आणखी तीन आरोपी असल्याचे समोर आले असून, अमोल चांदणे (रा अहिल्यानगर), बद्री आलम (रा. अचोवली, ठाणे), वाहीद (पूर्ण नाव माहीत नाही) अशी या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी पलार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोर्णीकडून २ कोयते, ५ स्टीलचे पान्हे, १ लोखडी पक्कड, १ एक्स पान्हा व त्याचे ४ ब्लेड व ४ मोबाईल असे दरोड्याचे साहित्य मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe