Nilwande Water : निळवंडे कालव्यातून पाणी सुटणार ! वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा संपणार

Ahmednagarlive24 office
Published:
Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे कालव्याचे पाणी आज शनिवारी सोडण्यात येणार असून, याच आवर्तनात कोपरगाव शाखा कालव्याला पाणी देण्याचा प्रयत्न आहे. या कालव्याच्या कामाकरीता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा संपणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील केलवड येथे निळवंडे कोपरगाव शाखा कालव्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की, अकोले तालुक्यातील पहील्या २२ कि.मी. अंतरावरील काम सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कालव्याच्या कामांना वेग आला. यासाठी युती सरकार सतेवर यावे लागले.

पाण्याची प्रथम चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली. परंतू काही ठिकाणी कालव्यांना गळती असल्याने तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून पाणी बंद करावे लागले. पावसाने ही काम करण्यात अडथळे आले. परंतू विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही सर्व काम पूर्ण केली असून आज शनिवारी पाणी सोडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केलवड येथील शाखा कालव्याला या आवर्तनात पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासित करून या कामासाठी पाचकोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करण्यच्या सूचना अधिकाऱ्यांना देवून मंत्री विखे यांनी सांगितले की,

कामातील अडचणी कोणी विचारत घेत नाही. पण विखे पाटील पाणी येवू देत नाहीत हा आरोप केला जातो. अनेक ठिकाणी ठेकेदारांनी काम जाणिवपुर्वक बंद ठेवली आहेत. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही आपण दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

केलवड येथील कामात कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी सर्व मशिनरीची उपलब्धता करून देण्यात आली असून दुष्काळी परीस्थीतीत या पाण्याचा दिलासा मिळेल. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले.

तरी सुदैवाने धरण भरली असली, तरी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर कायम आहे. दरम्यान, मेंढीगिरी समितीच्या अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी राज्य सरकारने जुलै महिन्यात समिती गठीत केली असल्याने या संकटातही कसा मार्ग निघेल हा प्रयत्न आपला असल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe