Ahmednagar News : कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनातून विसापूर धरणात येत्या दोन दिवसात पाणी सुटणार असल्याचे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.
या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सोबत चर्चा होऊन त्यांनी विसापूर धरण्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
प्रसिध्दी पत्रकात नाहटा यांनी येत्या गुरुवारी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी कुकडी प्रकल्पाची कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली असल्याची माहिती देत.
त्यापूर्वी विसापूर धरणात पिण्यासाठी कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात माजी आमदार राहुल जगताप यांनी पाणी मिळण्याबाबत दिलेल्या पत्रावरून चर्चा होऊन, त्यानुसार त्यांनी विसापूर धरण्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
त्या नुसार कुकडी डावा कालव्यातून येत्या दोन दिवसात विसापूर धरणात पाणी सोडणार असल्याची माहिती संतोष सांगळे अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे यांनी दिल्याचे सांगितले.
तर आमदार बबनराव पाचपुते यांनी दि. २१ रोजी जिल्हाधिकारी, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास मंडळ पुणे आणि अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन विभाग पुणे यांना दिलेल्या पत्रावरून पाणी सुटले असल्याचा दावा आ बबनराव पाचपुते यांच्या कार्यकत्यांनी केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील सोशल मीडियावर पाणी सोडण्याच्या श्रेय घेण्यावरून सोशल वॉर सुरू झाले आहे.
झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत आ. बबनराव पाचपुते यांनी कोणतीच भूमिका घेतली नसून विसापूर खालील शेतकर्यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यानी विसापूर धरणात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याने कुकडीमधून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून या बाबत गैरसमज करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. – बाळासाहेब नाहाटा सभापती राज्य बाजार समिती