अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकारी व उमेदवारांनी प्रशासनाबाबत अविश्वास दाखवत, आज निवेदन देऊन मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणासह सुरक्षा यंत्रणेची माहिती देण्याची मागणी केली.
कर्जत नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरणे, काढणे व इतर सर्व कार्यक्रमात प्रशासनावर लोकप्रतिनिधी व ठराविक कार्यकर्त्यांचा असणारा दबाव,
दडपशाही व झालेली दादागिरी पाहता तसेच निवडणूक चालु झालेली असताना भाजपाचे प्रभाग क्रं २ मधील अधिकृत उमेदवार निता अजिनाथ कचरे व पुजा अनिल कचरे यांचा उमेदवारी अर्ज प्रशासनाला हाताशी धरून
दबाव तंत्राने काढण्यात आला व प्रभाग क्रं १४ मधील उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करुन व आदर्श आचारसंहीतेचा भंग करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिलेला अनपेक्षीत पाठिंबा.
या सर्व घडामोडी पाहता आमचा प्रशासनावर अजिबात विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे मतदान झाल्यानंतर सील झालेली मतदान यंत्रे किती सुरक्षित ठेवली, त्यासाठी किती सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले आहेत.
व त्यासाठी लावण्यात आलेली सुरक्षा कशी आहे याची संपुर्ण माहिती मिळावी व ती प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करावी व या सर्व यंत्रणेवर प्रशासनाने कडक लक्ष ठेवावे,
अशी मागणी करणारे निवेदन प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम