अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राष्ट्रवादी पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यातील नेत्यांना सर्वकाही देत प्रचंड प्रेम केले. पण त्यांनी मात्र विश्वासघात करून पवारांना उतारवयात मनस्ताप दिला.(OBC reservation)
त्यामुळे जनतेने किरण लहामटेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देत धडा शिकवला. आता नगरपंचायत निवडणुकीतही मतदार त्यांना नक्कीच पुन्हा धडा शिकवतील.
ओबीसींचे आरक्षण भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील निर्णयातून गेले. आम्ही आकाश पाताळ एक करू, पण ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध लढून समाजाला आरक्षण मिळवून देऊच, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मुश्रीफ यांची सभा अकोले बसस्थानक परिसरात शनिवारी झाली. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार डॉ. किरण लहामटे होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी अध्यक्षीय सूचना केली. त्यास शेतकरी सेनेचे प्रदीप हासे यांनी अनुमोदन दिले.
प्रास्ताविक अरुण रूपवते व सूत्रसंचालन तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी केले. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,
अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर, यमाजी लहामटे,
विठ्ठल चासकर, संपतराव नाईकवाडी, सुरेश गडाख, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, भाऊपाटील नवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, प्रदीप हासे होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम