अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलिस हा आपला जवळचा मित्र वाटला पाहिजे, अशा पद्धतीने काम करू, असे नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
स्नेहबंध फाउंडेशन तर्फे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी नूतन पोलीस अधीक्षक पाटील यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, जे काही समाजासाठी योग्य रीतीने करता येईल, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.
कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक हे माझ्या दृष्टीने प्राधान्य राहील. याचबरोबर कायदा, सुव्यवस्था आणि विविध आंदोलने योग्य पद्धतीने हाताळणार आहे. यावेळी उद्धव शिंदे यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved