डॉ विशाखा शिंदे घरी परतल्यानंतर असे झाले स्वागत..

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- देवळाली प्रवरा हेल्प टीमने डॉ. विशाखा शिंदे सुखरूप घरी पोहचल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून देवळाली मध्ये त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना डॉ विशाखा यांच्या मातोश्री पद्मा शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी देवळाली हेल्प टीम चे दत्ता कडू पाटील,

आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, ऋषिकेश संसारे, विजय कुमावत यांचे सह विशाखा चे वडील राजेंद्र शिंदे, अहमदनगर जिल्हा पेट्रोल पंप डीलर्स असोचे अध्यक्ष चारुदत्त पवार हेही उपस्थित होते.

प्रसंगी भावनाविवश होऊन बोलताना विशाखाच्या आई पद्मा शिंदे म्हणाल्या की, आमचे कुटुंबावर बेतलेल्या संकट समयी देवळाली हेल्प टीम सह समस्त देवळालीकर,

वैद्यकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील संघटना, पत्रकार, आदींसह ज्ञात अज्ञात व्यक्ती अश्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा व्यक्त करून

आमचे मनोबल वाढविले आणि या संकटातून बाहेर येनेसाठी मदत केली त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाणे या पुढील लढाही आम्ही याशस्वीपणे लढू याची खात्री वाटते.

आपले सर्वांचे आशिर्वाद आणि सहकार्य असेच कायम आमचे परिवाराचे पाठीशी राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना असे शेवटी विशाखाच्या आईने सांगितले.