Ahmednagar News : भिंगार येथील शुक्रवार बाजारात भाजीपाला खरेदीस गेलेल्या महिलेचे तब्बल ६० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली.
बेबी रतनलाल फिरोदिया (रा. दाणे गल्ली, भिंगार) या महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजीपाला आणायला गेली अन् दागिने गमावून बसली..अशीच म्हणण्याची वेळ त्या बेचाऱ्या महिलेवर आली.

Ahmednagar News
बेबी फिरोदिया या शुक्रवारी भिंगारच्या शुक्रवार सदर बाजारात भाजीपाला खरेदीस गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरुन पोबारा केला. या प्रकरणी पुढील तपास सपोनि. सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दहिफळे हे करत आहेत.