अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- सध्या घरफोडी करण्याच्या घटना वाढत असून आता तर चक्क घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून समोरील भिंत पाडून घरातील सामान व इतर वस्तू टेम्पो तुन चोरून नेल्याची घटना शिर्डी शहरात पालखी रोडलगत सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कैलास बाबुराव मैंद (रा. नाशिक) यांचे शिर्डीत घर आहे.
ते नाशिकला असताना व घरी कोणी नसताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहाता येथील सागर सुरेश मुंडलिक व प्रशांत सुरेश मुंडलिक यांनी आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन घराचे कुलूप तोडून, बाहेरील भिंत पाडून,
घरातील जुना लाकडी सोफा, इन्व्हर्टर व बॅटरी, लोखंडी कपाट, लोखंडी खुर्ची, गॅस टाकी व शेगडी तसेच इतर वस्तु असे ६७ हजार रुपये किंमतीचे सामान घरफोडी करत चोरून नेले.
भरदिवसा आयशर टेम्पोमधून हे सामान नेले.सागर मुंडलिक व प्रशांत मुंडलिक (रा. राहता) यांनी साथीदारांच्या सहकार्याने सामान चोरून नेले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम