खासदार निलेश लंके यांना उपोषण न करण्यासाठी दिलेल्या ऑफर संदर्भात नेमका खरा प्रकार काय आहे. पोलिस प्रशासनावर केलेल्या ५ कोटीच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलिसांची बदनामी झालेली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मनसेने सुरु केलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
खासदार लंके यांनी केलेल्या आरोपांमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व पोलिस प्रशासनाची प्रतीमा, विश्वासाहर्ता अबाधित ठेवण्यासाठी चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
रात्री भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजगुरू यांच्या विनंतीवरून पोलिस उपअधीक्षक खैरे यांच्या सोबत चर्चा करून पोलिस प्रशासनावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या चौकशीचे माध्यमातून आश्वासन मिळाल्यानंतर मनसेने हे आंदोलन मागे घेतले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, सुपा उपसरपंच दत्ता पवार, माजी सरपंच बाळासाहेब पवार, उपचिटणीस मंगेश शिंदे, उपचिटणीस भालचंद्र आनंदकर, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, ज्ञानेश्वर गिरी, दत्ता पडवळकर यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. पोलिस या प्रश्नावर गप्पा आहे, अशी जनतेत जोरदार चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मनी आहेत. त्यामुळेच खा. लंकेनी ५ कोटींच्या केलेल्या आरोपावर पोलिस गप्प बसून आहेत.
त्यामुळे जनतेत सभ्रम निर्माण करून साटेलोटे करत अवैध धंद्यावाल्यांकडून मोठा हप्ता सुरू करण्याचा डाव रचला जातोय, असे आरोप मनसे नेते अविनाश पवार यांनी आंदोलन मागे घेताना केला.