अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जागेचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाला चांगलेच महागात पडले. चौघांनी त्या युवकावर लोखंडी रॉडने मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोहेल गनी सय्यद (वय 23 रा. गजराजनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे.
एमआयडीसी हद्दीतील गजराजनगर चौकात ही घटना घडली. दरम्यान सय्यद याने रूग्णालयात एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हफीज अन्सारी, बारक्या हफीज अन्सारी,
बड्या हफीज अन्सारी व हफीज अन्सारी याची पत्नी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सोहेल सय्यद याच्या मावशीचे त्यांच्या शेजारील व्यक्तींशी जागेच्या कारणावरून 15 दिवसांपूर्वी वाद झाले होते. ते वाद मिटविण्यासाठी सोहेल हा गेला होता.
याचा राग मनात धरून आरोपींनी गजराजनगर चौकाजवळील बेकरीजवळ सोहेल यास अडविले व त्यास लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम