Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? महसूल मंत्र्यांच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी तहसीलदारांची अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व याच्या आयोजनासाठी तहसीलदार सौंदाणे यांनी तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या प्रमुखाकडून पैसे जमा केल्याचे वृत्त आले आहे. तशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.

दोन हप्त्यांपुर्वी पानोली रस्त्यावरील मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. अधिकाऱ्यांच्या बैठकीत तहसीलदार सौंदाणे कार्यक्रमाच्या आयोजनाच्या खर्चासाठी सर्व विभाग प्रमुखांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषणातून स्पष्ट होत आहे.

काय ऐकू येत आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?

यापूर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या खर्चासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. मात्र, मागणी करूनही कोणीही पैसे दिले नाहीत. मला एकटीला खर्च करावा लागला. यावेळी कार्यक्रमासाठी सुमारे अडीच लाख खर्च अपेक्षित आहे.

गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, महिला व बाल कल्याण विभाग, नगर पंचायत यांनी प्रत्येकी वीस हजार रुपये जमा करावेत. इतर विभागांनी प्रत्येकी १० हजार रुपये जमा करावेत, असे या ऑडिओक्लिप मध्ये ऐकू येते.

तहसीलदार म्हणतात, तो माझा आवाज नाही..

दरम्यान ही ऑडिओ क्लिप जी आहे त्यातील आवाज माझा नाही. अशी मागणी मी कधीही केलेली नाही. मला अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे तहसीलदार सौंदाणे म्हणाल्या आहेत.

सदर ध्वनिफीतीतील आवाज आपला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी गणेश राठोड यांना दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News