Ahmednagar News : गेल्या अनेक पिढ्या विखे पाटलांनी पारनेर तालुक्यात राजकारण करून सत्ता भोगली असून, विकासाच्या गप्पा मारणार्या विखे यांचे पारनेरसाठी योगदान काय ? असा हल्लाबोल आमदार निलेश ल॑के यांनी विखे पिता- पुत्रांवर येथील विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी केला.
विकासाच्या वल्गना करणाऱ्या खासदार सुजय विखे यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही, असा आरोपही आ. ल॑के यांनी या वेळी केला.
शहरातील विविध विकास कामांसाठी आपण आत्तापर्यंत तब्बल १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. शहराच्या इतिहासात आत्तापर्यंत आलेल्या निधीच्या शंभर पट निधी आपण आणल्याचा दावा त्यांनी केला. शहरात झालेल्या कामांची व मंजूर कामांची यादीच त्यांनी वाचून दाखवली.
शहरातील ३८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते सोमवारी रात्री झाले, या वेळी ते बोलत होते. सोमवारी (दि. ११) दिवसभर आमदार लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत जोरदार चर्चा होती. त्यासंदर्भात बोलणे मात्र त्यांनी टाळले.
अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे होते. या वेळी जि.प. च्या माजी सदस्या राणीताई लंके, अर्जुन भालेकर, माजी सभापती सुदाम पवार, डॉ. बाळासाहेब कावरे, शिक्षक नेते रा.या. औटी, प्रा. संजय लाकूडझोडे, संजय वाघमारे,
नगराध्यक्ष नितीन अडसूळ, पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते, मुख्याधिकारी विनय शिपाई, गंगाराम बेलकर, निवृत्त पोलीस उपायुक्त राम पठारे, सभापती भुषण शेलार, सभापती डॉ. विद्या कावरे, जायदा शेख, प्रियांका सचिन औटी,
नीता देवराम ठुबे, डॉ. सादिक राजे, नंदकुमार देशमुख, विजय डोळ, बाळासाहेब नगरे, श्रीकांत चौरे, सुवर्णा धाडगे, उमाताई बोरूडे, वैजयंता मते, सुरेखा भालेकर, उमाताई बोरुडे, सुवर्णाताई धाडगे, दिपाली औटी, बंडू गायकवाड,
अमित जाधव, रमिज राजे, दादा शिंदे, सचिन नगरे, सुभाष शिंदे, अॅड. गणेश कावरे, सुभाष कावरे, विविध समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.