Ahmednagar News:अलीकडच्या काळात चंदन, हस्तिदंत, पेट्रोल, डिझेल व आता काय तर कोळशाची देखील अवैधरितीने वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील पाथर्डी तालुका
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोळशाची अवैधरीत्या वाहतूक करणारा एक पिकअप
पाठलाग करुन पकडला. यात लाखो रुपये किमतीचा चौदा क्विटंल कोळसा व टेम्पो वनाधिका-यांनी जप्त केला असून याप्रकरणी प्रमोद
बाबासाहेब ज-हाड( रा. गारखेडा, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले आहे.

पाथर्डी
तालुक्यात अवैध वृक्षतोडीविरुद्ध वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी जोरदार मोहीम राबविली आहे. दरम्यान शनिवारी रात्री तालुक्यातील तोंडोळी येथुन कोळश्याची अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहीती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रात्री दहा वाजता मौजे तोंडोळी तांडा
येथून औरंगाबादकडे कोळसा अवैध वाहतूक करणारा बोलेरो पिकप (क्रमांक MH२०EL९३८७) हा अवैधरीत्या कोळसा घेवुन जात होता. त्याचा पाठलाग करून शेवगाव तालुक्यातील
शिंगोरी येथे पकडून १४०० किलो कोळसा व पिकअप जप्त केला.
रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना वनविभागाने अवघ्या दोन महीन्यात सुमारे सात ते आठ गुन्हे दाखल केले आहेत. तर लाखो रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.