Ahmednagar News : रिझव्हं बँकेने नगर अर्बन बँकेचा बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना रद्द केला. हा परवाना बुधवारी रद्द करण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून बँकेचे ठेविदार प्रचंड धास्तावले आहे.
ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार ? असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. दरम्यान गुरुवारी बँकेच्या ठेवीदारांनी तसेच सभासद व बँकेशी निगडीत असलेल्या मान्यवरांनी बँकेत गर्दी केली होतो. प्रशासनाच्या वतीने सभासद, ठेवीदार यांना अफवांवर विश्वास ठेवू नका, ठेविदारांनी काळजी करू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले.
नगर अर्बन बँकेला ११३ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. १ डिसेंबर २०११ पासून बँकेवर संचालक मंडळ नियुक्त झालेले आहे. नव्या संचालकांनी कारभार स्विकारल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आठवड्याभरातच बँकेच्या कामकाजावर निर्बंध लादले. हे निर्बंध लावून दोन वर्ष पूर्ण झाले असतानाच रिझर्व्ह बँकने आता अर्बन बँकेचा परवानाच रद्द केला आहे.
बँकीग कामकाज समाधानकारक नाही, तसेच थकबाकी वसुली पुरेशी नाही असा ठपका ठेवत बँकेचा बँकींग व्यवहार करण्याचा परवाना रद्द का करण्यात येवू नये अशी नोटीस २२ जुलै २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने बँकेला दिली होती.
त्यानंतर आता रिझव्हं बँकेने नगर अर्बन बँकेवर परवाना रद्दची कारवाई केली आहे. दरम्यान, बँकेच्या सध्या ३६ शाखा आहेत. बँकेच्या सुमारे १६०० पेक्षा अधिक थकबाकीदारांकडे साडेचारशे कोटीची मुद्दल व त्यावरील व्याज मिळून तब्बल ८२७ कोटी येणे बाकी आहे.
बँकेच्या ठेवीही मोठ्या प्रमाणात आहेत. ठेविदारांना ३०० कोट रुपये देणे आहे. तसेच २७५ कर्मचारी असून त्यांचा फंड व पगारही देणे आहे. अशा प्रकारच्या विविध अडचणी बँकेसमोर असून आता तर बँकेचा परवाना रद्द झाल्याने अर्बन बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय झाला आहे.
ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
ठेवीदारांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बँकेच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रिझव्ह बँकेने बँकेचे बँकींग परवाना रद्द केला आहे. बँकेचे १ लाखापेक्षा जास्त सभासद असून, ३६ शाखा कार्यरत आहेत.
बँकेच्या ठेवी ३२२.५९ कोटीच्या आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेकडे आहेत त्या सुरक्षित असून, केंद्रीय निबंधक कार्यालयाकडून पारीत होणाऱ्या पुढील आदेशानुसार कामकाज होईल. म्हणूनच ठेवीदारांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने केले गेले आहे.