अहमदनगर : हृदयद्रावक ! गाडीची काच बंद करताना चिमुरड्याची मान अडकली, गळा दबून मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चारचाकी वाहनात खेळत असताना खिडकीची काच बंद करताना गळा दबून एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. राघव सागर कुदळे असे या मृत बालकाचे नाव आहे.

तो अवघ्या साडेतीन वर्षांचा होता. राघव च्या मृत्यूने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना कोपरगाव शहरानजीक असलेल्या जेऊर पाटोदा शिवारात घडली.

सविस्तर हकीकत अशी : भाऊसाहेब कुदळे यांचे कुटुंब जेऊर पाटोदा येथे राहते. त्यांच्याकडे जनावरांच्या चाऱ्यासाठी चारचाकी वाहन आहे. शनिवारी सकाळी घरासमोर गाडी उभी करून तो आपल्या कामात व्यग्र होता.

दरम्यान, त्यांचा नातू राघव खेळत कारमध्ये गेला. कारमध्ये खेळत असताना त्याने चुकून काच बंद करण्याचे बटण दाबले, त्यात मान अडकून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना जेव्हा कुटुंबीयाने पाहिली तेव्हा खूप उशीर झाला होता.

त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती बालकाच्या आजोबांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe