बोलताना जरासं भान बाळगावं…आमदार लंकेचा भाजपच्या ‘या’ नेत्याला सल्ला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. यातच आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील याप्रकरणावर भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध करत बोलताना जरा भान बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत.

देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी शरद पवार धावून गेले आहेत. मग गुजरातमधील भूकंप असो, किल्लारीचा भूकंप असो, कोल्हपूर सांगलीला आलेला महापूर असो… प्रत्येकवेळी शरद पवार मदतीसाठी पुढे गेले.

देशाच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, देशाचं राजकारण नेहमी त्यांच्याभोवती फिरत राहतं. मग अशा नेत्याविषयी बोलताना जरासं भान बाळगावं, असा सल्ला निलेश लंके यांंनी चंद्रकांतदादांनी दिला. तसंच चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलण्याचा सल्ला दिलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News