बांधकामाचे स्टील चोरताना खबर्‍याच्या नजरेत ते आले अन् पोलिसांच्या बेडीत अडकले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  बांधकामासाठी आणलेल्या 12 टन स्टीलची चोरी करणार्‍या सावेडी उपनगरातील चौघा आरोपींना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.(Ahmednagar Crime)

राहुल भास्कर फुलारे (वय 29), मिथून सुनील धोत्रे (वय 23 दोघे रा. पवननगर, भिस्तबाग), किशोर राजू धोत्रे (वय 27 रा. प्रेमदान हाडको), रोहित रामलाल प्रजापती (वय 26 रा. निर्मलनगर) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 14 डिसेंबर 2021 रोजी सावेडी उपनगरातील एका बांधकाम साईडवरून 12 टन स्टीलची चोरी चौघांनी केली होती.

ही चोरी करताना त्यांना एका व्यक्तीने पाहिले होते. ती व्यक्ती या चौघांना ओळखत होती. चोरी झाल्यानंतर याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरी करणार्‍या चौघांना पाहिलेल्या व्यक्तीने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. सर्व आरोपी हे भिस्तबाग महालाजवळ असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी भिस्तबाग परिसरातून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. आरोपींकडून चारचाकी वाहनासह स्टील असा दोन लाख 7 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे,

अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, दीपक जाधव, अहमद इनामदार, धिरज खंडागळे, सचिन जगताप, चेतन मोहिते, अमोल शिरसाठ, विशाल केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe