Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.१८) घडली. याबाबत महिलेच्या फिर्यादवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला करंजी येथील ४ जणांविरुद्ध मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने करंजीत एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत संबंधित महिलेने पाथर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.१५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करंजी येथील आबासाहेब उत्तम अकोलकर, महादेव रंगनाथ अकोलकर, अमोल उद्धव अकोलकर व नितीन साहेबराव अकोलकर आमच्या घरी येऊन म्हणाले की,

तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या विरुद्ध मतदान का केले, असे म्हणत शिवीगाळ करू लागले, त्यावेळी माझी सासू चंद्रकला व सासरे विष्णू दानवे हे त्यांना समजावून सांगत असताना महादेव रंगनाथ अकोलकर व अमोल उद्धव अकोलकर यांनी शिवीगाळ करून मला लाथाबुक्क्याने मारहाण केली
तर आबासाहेब उत्तम अकोलकर याने माझ्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद संबंधित महिलेने पाथर्डी पोलिसांत दिली आहे.