Ahmednagar News : ऊस देता का ऊस ! यंदा उत्पन्न घटले, कारखानदारांची उसाच्या पळवापळवीसाठी चढाओढ, उसतोडीच्या अनेक टोळ्या दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे उसाचे उत्पन्न घटले आहे. पावसाचा लहरीपणा तसेच इतर होणारा अमाप खर्च, ऊसतोडणी टोळ्यांच्या कराव्या लागणाऱ्या मनधारण्या आदींमुळे शेतकरी इतर पिकांकडे वळला.

परिणामी उत्पन्न घेतले. त्यामुळे आता कारखानदारांची उसाची पळवापळवी करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. राहुरी तालुक्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही.

उसाच्या आगारातच उसाची पळवापळवी

राहुरी तालुका उसाचे आगार म्हणून ओळखले जाते. परंतु यंदा पावसाअभावी उसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून आता सध्या तालुक्यात बारा साखर कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्यांनी तळ ठोकलाय. त्यामुळे शेतकरीही चांगला भाव द्या अन् ऊस घेऊन जा अशी भूमिका घेतोय.

तालुक्यात दरवर्षी १६ ते १८ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असतो मात्र, यंदा हे उत्पन्न ८ ते १० लाख मेट्रिक टन इतकेच असेल असा अंदाज आहे. इतर काही कारणांमुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. परिणामी उसक्षेत्र घटल्याने ऊस भेटणे मुश्किल झाले आहे.

त्यामुळे अनेक कारखानदार आता या उसावर डोळा ठेऊन आहेत. उसाची पळवापळवी करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली आहे. तालुक्यात सध्या प्रसाद शुगर, अशोक, डॉ. विखे, अगस्ती, काळे, कोल्हे यासह अन्य साखर कारखान्यांनी राहुरी तालुक्यात ऊस तोडणीसाठी टोळ्या पाठवल्या आहेत.

राहुरी कारखाना सुरु होईल? तालुक्याच्या कामधेनूचे काय आहे भविष्य?

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखला जायचा. परंतु सध्या हा कारखाना बंद आहे. या कारखान्यावर जिल्हा बँकेचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.

बँक भाडेपट्ट्यावर हा कारखाना चालविण्यास देण्याच्या तयारीत असला तरी त्यासाठी विरोध होत आहे. कामगार व ऊस उत्पादकांचे लक्ष जिल्हा बँकेच्या भूमिकेकडे लागले आहे. त्यामुळे राहुरी कारखाना सुरु होईल का? तालुक्याच्या कामधेनूचे काय भविष्य आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

* ऊस प्रसाद शुगरलाच द्यावा : तनपुरे

सध्या वांबोरी येथील प्रसाद शुगरचे गळीत सुरू झाले आहे. त्यामुळे राहुरीकरांनी प्रसाद शुगर लाच ऊस द्यावा असे अवाहन चेअरमन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. सध्या तालुक्यात प्रसाद शुगर, अशोक, डॉ. विखे, अगस्ती, काळे,

कोल्हे यासह अन्य साखर कारखान्यांनी राहुरी तालुक्यात ऊस तोडणीसाठी टोळ्या पाठवल्या आहेत. राहुरीकरांनी प्रसाद शुगर लाच ऊस द्यावा असे अवाहन चेअरमन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe