Ahmednagar News : कांदा निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : कर्डिले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट राज्यात अग्रेसर असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी या ठिकाणी आणत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहदारी सुरू झाली असून नेप्ती उपबाजार समितीचा विस्तार लवकरच शेजारील सात एकर जागेमध्ये केला जाणार आहे.

या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार आहे. तसेच चिचोंडी पाटील येथे कडधान्य मार्केट व गाई म्हशी विक्रीचा बाजार सुरू करण्यात येणार आहे.

नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डिझेल पंपही सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची सोय होईल. गणपती मंदिर उभारल्यावर या ठिकाणी नक्कीच शेतकरी वर्गामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होईल. कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

बाजार समितीचे चेअरमन बोठे म्हणाले की, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेत असून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचे काम केले जात आहे. श्री गणेश उत्सवाचे औचित्य साधून नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये भव्य दिव्य गणपती मंदिर उभारले जाणार आहे असे ते म्हणाले.

व्हा. चेअरमन सूळ म्हणाले की बाजार समिती आवारामध्ये व्यापारी व शेतकरी वर्ग श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. तसेच भंडाऱ्याचे आयोजनही केले जाते. आता भव्य दिव्य मंदिर उभारले जाणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe