यात्रेच्या कार्यक्रमात महिला सरपंचाचा विनयभंग

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील एका गावातील यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे श्रीफळ वाढवून मंचावरून खाली उतरत असताना

एका महिला सरपंचाचा गावातीलच काही टारगटांनी विनयभंग करून सरपंच महिलेस व तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबतची फिर्याद महिला सरपंचाने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५ ) रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली.

याबाबत एकूण दहा जणांविरोधात शेवगाव पोलिसांत विविध कलमांसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.

गावच्या महिला सरपंच यांनी मंचावर जाऊन गुरुवारी रात्री साडेनऊला श्रीफळ वाढवून औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर त्या स्टेजवरून खाली उतरत असताना गावातीलच सुधीर निवृत्ती जायभाये याने पाठीमागून येऊन त्यांना लज्जा उत्पन्न होईल,

असे वर्तन केले तसेच धक्का बुक्की करून ढकलून दिले, त्यावेळी तेथे असलेले भागवत निवृत्ती जायभाये, ज्ञानेश्वर भाऊसाहेब केदार, तुकाराम भाऊसाहेब केदार, संतोष अंबादास केदार, पांडुरंग माणिक केदार, संभाजी अंबादास केदार, प्रमोद रोहिदास केदार,

देवेंद्र बाळू जायभाये, महेश पांडुरंग केदार यांनी सरपंच व त्यांचे पती यांना शिवीगाळ करून तुम्हाला सरपंच झाल्यापासून जास्त झाले आहे. तुम्ही पुन्हा आमच्या नादी लागले तर तुला व तुझ्या पतीला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe