रेल्वे पटरीवर आढळला महिलेचा मृतदेह ; अपघात कि घातपात ? गूढ कायम…

Mahesh Waghmare
Published:

Ahilyanagar News.: १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर  रेल्वे गाडीच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी नगर- मनमाड रेल्वे महामार्गावर केडगाव शिवारात हनुमाननगर परिसरात घडली.कमल बाबासाहेब तांबे (रा. जय भवानी चौक, बुरुडगाव, ता.नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

तांबे यांचा मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आल्याने तांबे यांचा मुलगा शनेश्वर बाबासाहेब तांबे याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांनी त्यांना तपासून उपचार करण्यापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ. विशाखा शिंदे यांनी दिलेल्या अहवालावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार अनंत दाणी हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe