एसटी बस प्रवासादरम्यान महिलेचे १२ तोळ्यांचे दागिने केले लंपास ; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

Sushant Kulkarni
Published:

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सरकारने महिलांना एसटीचा प्रवास करताना सवलत दिलेली आहे.त्यामुळे आजमितीला जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील अनेक भागात महिला मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करताना दिसतात.मात्र यामुळे आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे.अनेकदा महिलांना एकट्याने प्रवास करावा लागतो.

नेमका याच संधीचा काही भामटे फायदा घेऊन प्रवासात महिलांचे दागिने लंपास करतात. नुकतीच एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून चोरून नेले.ही घटना दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाटोदा ते चांदणी चौक या प्रवासादरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी प्रतिभा राजेंद्र जायभाय (वय २९, रा. जायभाय वाडी जामखेड हल्ली रा. साई समर्थ कॉलनी, आवारे टॉवर जवळ, वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार) ही महिला धारूर ते पुणे या बस (क्र. एमएच २० बी २८२०) मधून रोहेतवाडी पाटोदा येथून घरी येत असताना प्रवासादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सहा तोळे वजनाचे पेंडल असलेले सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातील झुंबर,

५ तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट असे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नजर चुकवून चोरून नेले. याप्रकरणी प्रतिभा जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe