अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील निंबळक गावात सर्वच प्रमुख प्रशासकीय पदांचा कारभार महिला अधिकारी पाहत असून गावचे सरपंच पदही एक महिलाच सांभाळत आहे.
एकंदरीत निंबळक गावात महिलाराज सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगर तालुक्यातील निंबळक गावची लोकसंख्या २० ते २२ हजार आहे.
एवढी मोठी लोकसंख्या असून येथील सर्व कारभार महिला पाहताना दिसून येत आहेत. गावच्या सरपंच पदाची धुरा सौ. प्रियंका लामखडे या सांभाळत आहेत.
याबरोबरच ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य या तिन्ही खात्याचे कामकाज महिला अधिकारीच पाहत आहेत. ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे या काम पाहत आहेत
तर महसूल विभागात तलाठी म्हणून प्राजक्ता साळवे तर आरोग्य अधिकारी म्हणून रूपाली मोहोळकर या काम पाहत आहेत. एकंदरीत गावातील मुख्य विभागातील जबाबदारीचे काम महिला अधिकारीच सांभाळत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम