अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील सहा एसटी आगारातील वाहक आणि चालक यांचं काम बंद आंदोलन सुरू झाल्याने नगर शहरातील ताराकपूर या आगारातून आज रविवारी सकाळपासूनच एकही बस इतर ठिकाणी जाऊ शकलेली नाही.
त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. शहरातील तारकपूर आगारासह जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा येथील राज्य वाहतूक महामंडळाची एकही बस त्याच्या आगारातून बाहेर पडलेली नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
हे सर्व कर्मचारी एकत्र जमले असून शासन जोपर्यंत विलीनीकरणाचा करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणताही वाहक चालक सेवेत रुजू होणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.
वाहक आणि चालक यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून शासन किंवा न्यायालय कोणताही निर्णय घेऊ किंवा कोणतीही कारवाई करू मात्र जो पर्यंत विलीनीकरण करण्याचा निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन कायम राहील असं ठणकावून यावेळी सांगण्यात आले.
अशातच दिवाळी सणोत्सव सूर आहे यामुळे बस स्थानकावर प्रवासी यांची संख्या वाढते आहे. मात्र कामबंद आंदोलनामुळे प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहे. आर्थिक नैराश्यातून आतापर्यंत 35 एसटी वाहक-चालक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यामुळे परिवहन मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी संघटनांची मागणी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम