आज लॉन्च होतायेत Yamaha च्या MT-03 व R3 या शानदार बाईक, जाणून घ्या सर्व माहिती

Published on -

यामाहा ही एक दुचाकी क्षेत्रातील अत्यंत नावाजलेली कंपनी आहे. या कंपनीच्या दुचाकी त्यांच्या युनिक असण्याने नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. या बाईकची स्टाईल, लूक, फायरिंग आदी गोष्टींचं एक वेगळीच क्रेझ आहे. आता यामाहा प्रेमींसाठी एक मोठी खुशखबर आहे. कंपनी आज 15 डिसेंबर रोजी आपल्या दोन नवीन बाइक लॉन्च करत आहे.

Yamaha MT-03 आणि R3 या दोन बाईक लाँच होणार आहेत. MT-03 हे कंपनीचे नवीन मॉडेल आहे. R3 हे मॉडेल 2020 मध्ये बंद केले गेले होते. यामाहाचे चाहते अनेक दिवसांपासून MT-03 या बाईकची वाट पाहत होते. अखेर ही बाईक आज लॉन्च होत आहे.

या शानदार बाइकमध्ये 321 सीसीचे हाय पॉवर इंजिन आहे. यात 14 लिटरची मोठी फ्युएल टॅंक असून 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. यावरूनच तुम्ही बाईकच्या पॉवरचा अंदाजा लावू शकता.

बाईकविषयी इतर माहिती

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शानदार बाईकची किंमत किती असेल? डिलिव्हरी कधी पासून सुरु होतेय? सध्या तर, कंपनीने आपल्या नवीन बाईकची किंमत आणि डिलिव्हरी डेटबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

या बाईकची डिलिव्हरी जानेवारी 2024 मध्ये सुरू होईल असे सांगितले जात आहे. एका रिपोर्टनुसार या बाईकच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.50 लाख रुपये असेल. यामाहा बाईकमध्ये 17 इंच टायर साइज असेल. बाईकच्या सीटची 780 मिमी हाईट असणार आहे.

पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

QJ Motor SRK 400 आणि KTM 390 Duke सारख्या स्टायलिश मोटारसायकलींना Yamaha MT 03 ही टक्कर देईल. यामध्ये सर्व लाइट LED असतील. बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम असेल. ही बाईक सिम्पल हँडलबार आणि स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि ट्रिपमीटरसह येणार आहे.

या बाईक 25 kmpl चे मायलेज देईल असे म्हटले जात आहे. अपडेटेड व्हर्जनमध्ये बाइकच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल होणार नाही. बाइकच्या फ्रंट लूकमध्ये बदल केले जाऊ शकतात. आता उद्याच सर्वच बाईक चाहत्यांची नवीन व्हर्जनची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe