विमा योजनेतील शेतकऱ्यांत ‘हा’ संभ्रम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-शेतकरी वर्ग हा जे काही कष्ट करतो ते सर्व निसर्गावर अवलंबून राहून करतो. परंतु बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीने मात्र त्यांचे प्रचंड नुकसान होत असते.

परंतु हे सर्व असले तरी यातून काही मदत मिळावी यासाठी तो नेहमीच विमा काढत असतो. यंदा मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीची सरकारी मदत मिळेल, पण या मदतीबरोबर विमा संरक्षण योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना विमा परताव्याची रक्कम मिळणार का? असा सवाल पाचेगावातील शेतकरी वर्गातून होत आहे. पाचेगाव परिसरात जवळपास 850 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

तर नेवासा बुद्रुक मंडलात अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. गावातील जवळपास 75% शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान पीक योजनेत सहभाग नोंदवला आहे. या भागातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले म्हणून या भागातील शेतकर्‍यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला आहे. शेतकर्‍यांना शासनाच्यावतीने मिळणार्‍या नुकसान भरपाईबरोबर पीक विमा परतावा मिळावा.

असे झाले नाहीतर पंतप्रधान पीक विमा योजनेत या भागातील शेतकरी यापुढे सहभाग घेणार नाहीत. तशीच ही योजना फसवी आहे, असेही बोलणे वावगे ठरणार नाही. असे या भागातील शेतकरी चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी राहता तालुक्यातूनही विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांतून ओरड ऐकू येत होती. राहाता या तालुक्यात 25 हजार शेतकर्‍यांकडून 13 कोटींचा पीक विमा हप्ता घेतला आहे.

विमा योजनामध्ये शेतकरी हिस्स्याबरोबर राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकर्‍यांच्यावतीने विमा कंपनीला पीक विमा हप्ता भरते. 2020-21 वर्षाकरिता नगर जिल्ह्यासाठी सरकारने भारती अ‍ॅक्सा जनरल इशुरन्स पीक विमा कंपनी निश्चीत केली असून राहाता तालुक्यातील जवळपास 24 हजार 947 शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. 17 हजार 556 हेक्टरवरील सोयाबीन,

बाजरी, मका, कपाशी पिकासाठी शेतकरी हिस्सा म्हणून 1 कोटी 32 लाख 946 रुपयांचा पीक विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला आहे. शेतकर्‍यांच्यावतीने राज्य सरकारने यामध्ये 5 कोटी 83 लाख 58 हजार 145 रुपयांचा राज्य हिस्सा दिला असून केंद्र सरकारचाही यामध्ये शेतकर्‍यांच्यावतीने तेवढाच 5 कोटी 83 लाख 58 हजार 145 रुपयांचा पीक विम्याचा हिस्सा आहे. मात्र अद्याप पीकविमा कंपन्यांकडून परतावे देण्याबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment