हो..हो..हेच ते मारेकरी..! रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या आईने कोर्टात ओळखले, पहा काय झालं कोर्टात

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Rekha Jare Murder Case : तीन वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर २०२० रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या झाली होती. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा देखील अटकेत आहे.

या हत्या प्रकरणाची काल (दि.७ डिसेंबर) कोर्टात सुनावणी सुरु झाली. काल या हत्याकांडातील आरोपींची दूरदृश्य प्रणालीद्वारे ओळख परेड घेण्यात आली. यातील दोघा मारेकऱ्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांच्या आई सिंधूताई वायकर यांनी ओळखले.

या प्रकरणी आज शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर उलट तपासणी होणार आहे.

अहमदनगर जिल्हा न्यायालयात रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणावर सुनावणी सुरू झाली असून या प्रकरणातील मूळ फिर्यादी मयत रेखा जरे यांच्या आई सिंधूताई वायकर या सुनावणीला प्रत्यक्ष हजर होत्या. त्यांच्यासमोर दुरदृश्य प्रणालीद्वारे तीन आरोपींना हजर करण्यात आले.

यातील एक आरोपी डमी होता. यातील फिरोज शेख व गुड्ड्या शिंदे या दोन मारेकऱ्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सिंधूताई वायकर यांनी ओळखले. या दोघांनी मोटारसायकलवरून येऊन आपल्या मुलीची हत्या केली असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले.

हैदराबाद येथील आरोपी सुनावणीला गैरहजर

रेखा जर हत्याकांड प्रकरणात हैदराबाद येथील आरोपींचा देखील समावेश आहे. परंतु ते सुनावणीला गैरहजर राहत आहेत. न्यायालयाने याची दखल घेत त्यांना तंबी देत उलटतपासणीस हजर राहण्याचे आदेश दिलेत.

काय घडले होते प्रकरण

रेखा जरे यांची २० नोव्हेंबर २०२० रोजी नगर – पुणे रोडवरील जातेगाव घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. जरे पुणे येथून नगरला येत असताना रस्त्यात अडवून त्यांचा खून करण्यात आला.

प्रेमप्रकरणातून वारंवार झालेले वाद आणि यातून होणाऱ्या बदनामीच्या भीतीतूनच बाळ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या केल्याचे समोर आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe