तुला मारायची सुपारी द्यायची आहे; म्हणून तुझा व्हिडिओ काढला असे म्हणत… !

Pragati
Published:

Ahmednagar news : कॉलेजला जाण्यासाठी रस्त्याने मोटारसायकलवर जात असलेल्या एक अल्पवयीन तरुणाच्या मोटारसायकला कार आडवी लावून तु तुझ्या आईला घेऊन राहुरी कोर्टात तारखेला का जातो? असे म्हणून एका अल्पवयीन तरुणास एक पुरुष व एका महिलेने शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच तुला मारायची सुपारी द्यायची आहे; असे म्हणत. मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सडे येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन तरुण राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे राहातो. त्याने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो खंडाबे खुर्द येथुन राहुरी कॉलेजला येण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवर निघाला होता. त्यावेळी तो सडे रोडने येत असताना त्याची मोटारसायकल पंक्चर झाल्याने तो सडे रोडवरील एका पंक्चरच्या दुकानात थांबला. त्यावेळी एक महिला मोबाईलमध्ये त्याचा व्हीडीओ काढीत होती.

दरम्यान त्याची मोटारसाययकल दुरुस्त झाल्यानंतर तो तरुण मोटारसाययकल घेऊन तेथुन राहुरी रोडने येत होता, यावेळी पाठीमागुन आलेल्या एका कारने त्याच्या मोटारसायकलला कार आडवी लावून त्यास थांबवले. फिरोजखान हसन पठाण व एक महिला असे दोघेजण खाली उतरले व म्हणाले, तु प्रत्येक वेळी तुझ्या आईला कोर्टात घेऊन का जातो? असे बोलुन शिवीगाळ करु लागले.

त्यावेळी तरुण त्यांना म्हणाला की, ती मझी आई आहे, मला तिची काळजी आहे. म्हणुन मी तिला कोर्टात घेऊन जात असतो. तेव्हा आरोपींनी तरुणाला धरुन जबरदस्तीने कारमध्ये टाकीत असताना तरुण कसाबसा त्यांच्या हातातुन निसटला. तेव्हा आरोपी म्हणाले, तुला मारायची सुपारी द्यायची आहे. त्यामुळे तुझा व्हिडिओ काढला.

घटनेनंतर तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून फिरोजखान हसन पठाण व एक महिला (दोघे रा. सडे, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe