अहमदनगर ब्रेकिंग : पाण्याच्या टाकीवरून पडून तरूण मजुराचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagarlive24

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर ग्रामपंचायतीच्या अमरधामशेजारील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.

शनिवारी (दि. ६) दुपारी १२ वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरचंद भवरलाल मेघवान (वय ३३, रा. चकमिटाई, सीकर, राजस्थान) असे मयत इसमाचे नाव आहे.

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात अमरधामशेजारी गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु आहे.

शनिवारी (दि. ६) सकाळी जेवण करून ईश्वर मेघवान व विकास नायक या दोघींनीही कामाची सुरुवात केली. दोघे पाण्याच्या टाकीवर चढले होते. ग्राईंडरने काम चालू होते, तेव्हा ग्राईंडरची वायर वारंवार निघत होती.

यावेळी विकास नायक याने ईश्वरचंदला पाण्याच्या टाकीवरून खाली पाठविले व वायरवर लक्ष देण्यास सांगितले.

पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर ईश्वर यास वर बोलावले. पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे बांधकाम साहित्य सरकवत असताना तोल जाऊन जवळपास ५० फुटांवरून खाली पडल्याने ईश्वरचंदचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो ३३ वर्षांचा असून त्यावर त्याचे नाव ईश्वरचंद भवरलाल मेघवान असल्याचे कळते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe