अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून संदिप चव्हाण या तरूणाला लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण करून, मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली.
ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल मानसी येथे घडली असून याबाबत 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप रायभान चव्हाण( वय २८ वर्षे ,राहणार देवळाली प्रवरा तालूका राहुरी ) या तरूणाने राहुरी पोलिसात सकाळी दहा वाजता देवळाली प्रवरा परिसरातील हॉटेल मानसी येथे संदिप चव्हाण व त्याचा एक मित्र दोघेजण जेवन करीत होते.
तेव्हा आरोपी तेजस कैलास पडाळे राहणार देवळाली प्रवरा ता. राहुरी. हा तेथे आला. तेव्हा तो संदीप चव्हाण याला म्हणाला की, तु माझे दुकानाचे लाईट मीटर का काढले.
असे म्हणाले असता संदीप चव्हाण त्याला म्हणाला की, मी तुमच्या दुकानाचे मीटर काढले नाही. असे म्हणाल्याचा तेजस पडाळे यास राग आला.
त्याने संदीप चव्हाण यास उचलुन खाली पाडले. लाथा बुक्कानी मारहाण करुन त्याच्या कानाजवळ काचेची बाटली मारुन दुखापत केली. तसेच त्याचा मिञ सचिन शिवाजी होले हा त्याचे तील भांडणे सोडवा सोडव करण्यासाठी आला. तेव्हा त्याला लाथा बुक्कानी मारहाण, शिवीगाळ केली.
आणि संदीप चव्हाण याची मोटार सायकलवर दगड टाकुन मोडतोड केली. नंतर जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
संदीप रायभान चव्हाण याच्या फिर्यादीवरून आरोपी तेजस कैलास पडाळे याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जानकीराम खेमनर हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम