तरुणाची गळफास घेत आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राहत्या घरात गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे हि घटना घडली आहे.

गौतम उत्तम खंडागळे (वय 45 वर्ष) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत खंडागळे बायको व मुलासह पुणे परिसरात कामानिमित्त राहत होता. तीन-चार दिवसापासून तो टाकळीमिया येथे एकटाच आला होता.

तो पुण्यास राहत असल्याने त्याच्या येथील घरास कुलूप होते व तो सध्या शेजारी राहत असलेल्या पुतण्याकडे राहत होता. पुतणेही मजुरीसाठी गेले असल्याने घरी कुणी नव्हते.

काल दुपारी 1 वाजेच्या दरम्यान खंडागळे याने घराच्या पडवीत गळफास घेतला. या घटनेची माहिती देवळाली पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण पाहणी करून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे पाठविला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News