टेम्पो दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Published on -

Ahmednagar News : श्रीगोंदा शहर परिसरात पारगाव रस्त्यावर टाटा आयशर कंपनीचा टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश उत्तम शिंदे (रा. ढवळगाव) या तरुणाच्या अंगावरून टेम्पो गेल्याने जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गणेश भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक गोरख बाजीराव फलफले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहे.

या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार फिर्यादी नुसार फिर्यादी यांचा चुलत भाऊ प्रथमेश उत्तम शिंदे हा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास स्पेलंडर मोटारसायकल (नंबर एम.एच.१६ ए.एल ८१६३) वरून श्रीगोंदा येथील काम उरकून ढवळगाव येथे जात होते.

श्रीगोंदा ते पारगाव जाणारे रोडवर श्रीगोंदा हद्दीमध्ये शुभम हॉटेल जवळ पुलाचे वळणावर समोरून येणाऱ्या टाटा आयशर कंपनीच्या टेम्पो व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश उत्तम शिंदे याला डोक्याला, हाताला तसेच पायाला लागल्याने गंभीर जखमी झाला.

उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe