Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विविध य योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना विविध प्रकारे मदत पुरवली जाते. यंदाच्या आर्थिक वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.
या अनुदानातून कृषी साहित्य खरेदी करता येईल. यात काहींना लाभ दिलेला आहे तर उर्वरितांनाही याचा लाभ मिळेल.
जिल्हा परिषदेचे मोठे नियोजन
सन २०१७-१८ पासून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडामधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५० हजारांची मदत दिली जाते. सन २०२२-२३ पर्यंत अहमदनगर मधील १३७ कुटुंबांना अशी मदत दिली गेली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी पाच लाखांची तरतूद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात केली गेली. उरलेली ६४ कुटुंब नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रतीक्षा यादीत असल्याने यातील
अधिकाधिक कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाने हवामान केंद्र स्थापन करण्याचा १५ लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी वळवला असल्याने यातून ३० कुटुंब मदतीच्या कक्षेत आले आहेत. आता यात ३४ कुटुंबे उरतात.
त्या कुटुंबांनाही मदत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्याचे नियोजित असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून मिळाली आहे.
कडबाकुट्टीसाठी अनुदान
शेतकऱ्यांना पशुसंगोपनसाठी कडबाकुट्टी आवश्यक असते. त्यामुळे ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी देण्याची योजना कृषी विभागाने हाती घेतली. यातून यंदाच्या आर्थिक वर्षी ३३३ लाभार्थ्यांना लाभ दिला गेला आहे. यासाठी सेस फंडमधून ३० लाखांची तरतूद जिल्हा परिषदेने केली.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत
शेतकऱ्यांना या योजनेंमधून मोठा आर्थिक लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांना विविध शेतीयोग्य कामे करण्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.