जिल्ह्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषद राबवणार ‘ही’ मोहीम

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पावसाळ्यात अनेकदा पाणी एकाच ठिकाणी साचून राहते, पावसाच्या या
साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया,गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. हे जलजन्य आजार रोखण्याबाबत तसेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषद जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट या दरम्यान ‘स्टॉप डायरिया’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती आशिष येरेकर यांनी दिली.

यात गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्व सांगण्यात येणार आहे.

या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावणेत येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता चावडी सुरू करणेत येणार आहे.

गावातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेणेत येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे यामध्ये कुजनारा व न कुजणारा कचरा यासाठी स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करणे येणार आहे.

अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे.

घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती करण्याची मोहीम ग्रामपंचायत ने हातात घेऊन शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी शौचालयांची नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे.

प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता विशेष विशेष स्वच्छता संमेलन भरवण्यात यावे यामध्ये विद्यार्थी शिक्षक यांचे मध्यान भोजन यासाठीची स्वच्छता व स्वच्छते बद्दल जागृता सत्र घेण्यात येणार आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe