अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे ढगाळ तसेच कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांसह पशु प्राण्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
नुकतेच जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे निर्माण झालेल्या गारठ्याने अनेक शेळ्या तसेच मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. आता या पशुपालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. जिल्ह्यात थंडी आणि संततधार पावसामुळे गुरूवारी 714 शेळ्या-मेंढ्या दगावाल्या होत्या.
त्यात शुक्रवारी 150 ची भरपडली आहे. यात पारनेर तालुक्यात 126 तर संगमनेर तालुक्यातील 24 शेळ्या-मेंढ्याचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या शेळ्या-मेंढ्यांची संख्या 864 झाली आहे. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
यामुळे जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग काही प्रमाणात या पशूपालकांना मदत करणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या सेस फंडात पैसा नसला तरी अन्य विभागाचा निधी अथवा बचतीतून यासाठी पैसे उभे करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.
जिल्ह्यात 800 हून अधिक शेळ्या आणि मेंढ्या मृत पावल्या आहेत. या जनावरांच्या पशूपालकांना जिल्हा परिषदेने मदत द्यावी, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
जिल्हा परिषद सेस फंडात सध्या यासाठी निधी नसल्याने अन्य विभागाचा अथवा बचतीच्या निधीतून किमान दोन हजार रुपये प्रती जनावरे आणि शक्य झाल्यास आणखी रक्कम यात टाकून पशूपालकांना मदत करण्यात येणार आहे. यासाठी 30 ते 40 लाख रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम