अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकटामुळे अनेक दिवसांपासून अनेकांच्या हातचे कामे गेलेली आहे. आता परिस्थितीत हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता साखर कारखान्यांचा गळीत हंगामास सुरुवात झाली आहे.
व ऊसतोड कामगार येऊ लागले आहे. या कामगारांच्या निवाऱ्यासाठी खास झेडपीच्या शाळांच्या खोल्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत. सध्या परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे.
अनेक घरांची पडझड झाली आहे. साखर कारखान्यांचा गाळप सुरू असल्याने बाहेरून ऊस तोडणी कामगार आलेले आहेत. या भयंकर पावसात त्यांचे होणारे हाल तसेच नुकसान पोहोचलेल्या गावकऱ्यांसाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा खुल्या करण्यात आलेल्या आहेत.
याबाबतची माहिती कर्जतच्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी दिली. गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
तसेच काही कामगार या पावसात अर्ध्या वाटेत अडकून पडलेले आहेत त्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत त्यामुळे त्या भागातील सरपंच, स्थानिक प्रशासनाने, गावकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करून माणुसकीच्या नात्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे.
आपत्तीच्या या काळात राज्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती व महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाला नुकसानग्रस्त भागातील शाळा खुल्या करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती सभापती कानगुडे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved