अभिमानास्पद ! अहमदनगरमध्ये खताच्या दुकानात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

api

Ahmednagar News :  वाळूचे कण रगडीता तेलही गळे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जर परिश्रम घेतले व चिकाटी असेल तर यश हमखास मिळते असे म्हटले जाते. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परिस्थितीही झुकवतात. असेच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेय. खताच्या दुकानात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा थेट पोलिस उपनिरीक्षक … Read more

तत्कालीन आयुक्त गोरे व जावळे यांच्या काळातील सर्व कामांची होणार चौकशी ! लाचलुचपतचे ‘हे’ आदेश

mahanagarpalika

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व डॉ. पंकज जावळे यांच्याबाबत एक मोठा आदेश काढलाय. त्यांच्या काळात दिलेल्या सर्व बांधकाम परवानगीचे लाच लुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात मागणी केली … Read more

डोळे फिरतील ! ६६ किलो सोने, ३२५ किलो चांदीचा गणपती बाप्पा, ४०० कोटींचे विमा संरक्षण, कोणत्या मंडळाचा? पहा..

onion

आता गणपती उत्सव तोंडावर आलाय. गणपती उत्सव महाराष्ट्रासाठी एक मोठा उत्सव असतो. मुंबई, कोल्हापूर, पुणे आदी भागात तर विशेष आरास केली जाते. शेकडो गणेश मंडळे या उत्सवात सहभागी होत असत. प्रत्येक मंडळाची एक विशेष खासियत असते. आता एका मंडळाचा गणपती बाप्पा ६६ किलो सोने, ३२५ किलो चांदीचा आहे. विशेष म्हणजे ४०० कोटी ५८ लाखांचे विमा … Read more

कांदा सुसाट ! अहमदनगरमध्ये विक्रमी किमतीकडे वाटचाल, पहा ताजे भाव

onion

Ahmednagar News : साधारण दोन ते तीन महिन्यापूर्वी कांद्याचे भाव प्रचंड गडगडले होते. निर्यातबंदी सारखे धोरण राबविल्याने शेतकरी मातीमोल झाल्याचा आरोपही करण्यात आला. परंतु आता कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून चांगलेच सुसाट सुटले आहेत. साधारण ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव मिळत आहेत. कांद्याचे भाव ५००० रुपयये प्रतिक्विंटल म्हणजे ५० रुपये प्रतिकिलोवर जाऊ शकतात असा … Read more

सुटकेचा निश्वास ! ‘समन्यायी’ची टांगती तलवार हटली, जायकवाडीत किती झाला पाणीसाठा? कशी आहे स्थिती? पहा..

jaykwadi

Ahmednagar News : मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाला आहे. त्यामुळे आता या विराट अशा जकवाडी धरणात तब्बल ६५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता ‘समन्यायी’ची टांगती तलवार हटली असून नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा यांच्यात होणाऱ्या संघर्ष या वर्षी होणार नाही हे आता … Read more

एसटी प्रवाशांनी गच्च भरलेली, चालकाला भोवळ आली.. पट्ठ्याने त्यातही प्रसंगावधान राखलं अन ५७ प्रवासी वाचले

bus

Ahmednagar News : आपण अनेक दुर्घटना दररोज वाचतो, पाहतो. आता अहमदनगरमधून देखील एका दुर्घटनेचा थरार समोर आलाय. भर रस्त्यावर धावत्या बसमध्येच चालकाला अचानक भोवळ आली. त्यात जवळपास विद्यार्थ्यांसह ५७ प्रवासी होते. परंतु भोवळ आलेली असतानाही चालकाने प्रसंगावधान राखून कृती केली अन..मोठी दुर्घटना टळली. यात चालकांसह ९ जण किरकोळ जखमी झालेत. अधिक माहिती अशी : बुधवारी … Read more

नगर-मनमाड रस्त्यावरून पालकमंत्री विखेंसह सरकारला जाग ! घेतला ‘हा’ निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

nagar manamad

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था हा नेहमीच चर्चेत असणारा विषय. या रस्त्याची झालेली दुरवस्था अन त्यामुळे होणारी प्रवाशांची दैना यामुळे नागरिकांत सध्या असांतोष आहे. आता या रस्त्याबाबत प्रशासन व शासन दोघेही ऍक्शनमोडवर आले आहे. येत्या १५ दिवसांत नगर-मनमाड महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यावर ही जबाबदारी … Read more

पवार-कोल्हे भेटीवर विवेक कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया ! तुतारी घेणार? शिर्डीत लढणार? भाजपचं तिकीट देणार? सगळं सांगितलं…

kolhe

Ahmednagar Politics : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना हेरलं आणि पवार यांनी पुण्यातील बैठकीनंतर कोल्हे यांना आवर्जून बोलावून आपल्या गाडीत शेजारी बसवून पुढचा प्रवास केला. त्यामुळे आता नगर जिल्ह्यात पवारांकडून नव्याने खेळी खेळली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू … Read more

धर्माचे लोन थेट शाळेत ! अहमदनगरमधील ‘या’ शाळेत मुलांमध्ये मारामाऱ्या; महापुरूषाच्या फोटोचा अवमान

hanamari

Ahmednagar News : एका धर्माबद्दल एका मुलाने पोस्ट टाकल्याच्या कारणावरून श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील एका शाळेमध्ये दोन गटातील मुलांमध्ये थेट हाणामाऱ्याचा प्रकार घडला. यामुळे आता धर्मांधतेचे लोन थेट शाळेपर्यंत पोहचल्याचे दिसून येत असून यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, एका विशिष्ट समाजाबद्दल एकाने पोस्ट टाकली याचा राग येवून शाळेमध्ये … Read more

चिंताजनक ! विद्यार्थी आत्महत्येचा दर लोकसंख्यावाढीपेक्षा अधिक, पहा स्पेशल रिपोर्ट

student

आपल्या देशात विविध कारणांनी विद्यार्थी आत्महत्येचा दर हा एकूण लोकसंख्या वाढीपेक्षाही अधिक असल्याचे धक्कादायक तथ्य बुधवारी एका संशोधन अहवालातून समोर आले आहे. प्रामुख्याने दाक्षिणात्य राज्य तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जीवन संपवण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे तपशील ब्यूरो’च्या (एनसीआरबी) माहितीवर आधारित ‘विद्यार्थी आत्महत्या : एक … Read more

अहमदनगरमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार ! दोन मुलांना किडनॅप करण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांचा पाठलाग, अन..

kidnap

Ahmednagar News : मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न शहरातील रामरिगबाबा टेकडी परिसरात रविवारी सायंकाळी फसला. यानंतर नागरीकांनी अपहरण करण्यासाठी आलेल्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. शहरात या प्रकाराने भीतीचे वातावरण आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना शहरवासीयांनी निवेदन दिले आहे. शहरातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुहास उरणकर यांचा … Read more

अहमदनगरमध्ये भीषण अपघात ! दोघे ठार, अनेक जखमी

apghat

Ahmednagar News  : नगर दौंड रोडवर बाबूर्डी बेंद (ता. नगर) फाट्याजवळ बुधवारी (दि. २८) सायंकाळी ६.३० च्या सुमरास भीषण अपघात झाला आहे. मोटारसायकल स्वाराला वाचवताना खाजगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या खाली जावून उलटली. यात बस चालक आणि ज्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तो मोटारसायकलस्वार असे दोघे जण ठार तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. खाजगी प्रवासी ट्रॅव्हल … Read more

मंत्री विखेंच्याच मतदारसंघावरून भाजपात घमासान, यंदा तिकीट मिळेल की दुसऱ्याला संधी? पहा..

vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघात फेरबदल पाहायला मिळतील. अनेकांची तिकिटे कापली जातील तर नवख्यांना संधी मिळेल. परंतु आता हा वाद किंवा भाजपांतर्गत कलह थेट मंत्री विखेंच्याच मतदार संघापर्यंत जाऊन पोहोचलाय. येथे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे राजेंद्र पिपाडा यांनी विखेंच्या विरोधात दंड थोपटलेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमुळे … Read more

डाळिंब उत्पादक मालामाल होणार, मिळतोय रेकॉर्डब्रेक भाव

dalimb

Ahmednagar News  : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये डाळिंबाला काल मंगळवारी (दि.२७) उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर बाजार समितीमध्ये एक नंबर डाळिंबाला प्रति किलो २५१ ते ३५० रुपयापर्यंत पर्यंत भाव मिळाला आहे. तसेच दोन नंबर डाळिंबास १५१ … Read more

आ. शंकरराव गडाख यांना अटक का करायचीये? महायुतीकडून ब्लॅकमेलिंग होतंय का?

GADAKH

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांपैकी एक म्हणजे गडाख कुटुंब. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे योगदान आहे. त्यानंतर आ. शंकरराव गडाख यांनी आपले राजकीय स्थान टिकवून ठेवले. राज्यात झालेल्या राजकीय फुटाफुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. त्यांच्या रिलेटेड काही प्रकरणे … Read more

हप्ते गोळा करत मतदारसंघ गहाण ठेवला, आ. राजळेंबाबत गंभीर गौप्यस्फोट

Monika Rajale

Ahmednagar Politics : दोन्ही तालुक्यात प्यायला पाणी नाही, नीट रस्ते नाहीत, कोट्यवधींचा पीक विमा आणला म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया नाही, शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले मात्र दहा वर्षानंतर यांनी विधानसभेत आवाज उठवला. केवळ हप्ते गोळा करत यांनी मतदारसंघ गहाण ठेवला असून या वेळी परिवर्तन करा व चंद्रशेखर घुले यांना विधासनसभेत पाठवा, असे … Read more

सभा कारखान्याची, जुगलबंदी रंगली नागवडे-शेलारांची ! जगताप-पाचपुते मात्र गायब

nagvde

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिग्गज राजकारणी आहेत. श्रीगोंदे तालुक्यात मात्र दिग्गजांची संख्या लक्षणीय आहे. आगामी विधानसभेला ही दिग्गज मंडळी एकमेकांची डोकेदुखी ठरतील हे मात्र नक्की. या दिग्गजांची आतापासूनच एकमेकांवर फटकेबाजी सुरु झाली आहे. याची प्रचिती आली आहे सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत. नागवडे कारखान्याची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखान्याचे … Read more

सात लाख बहिणींना पैसे, सव्वा लाख खाते संलग्न नाहीत, दुसऱ्या टप्प्यात तीन लाख अर्ज.. पहा अहमदनगरची थक्क करणारी आकडेवारी

ladaki bahin

Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग झालेत. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले आहेत त्यांना आता ३१ ऑगस्टला पैसे मिळणार असल्याची माहिती समजली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा … Read more