ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे संकट

Ahmednagar News

Ahmednagar News : अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीची परवड होवून वाताहत झालेली असताना चालू वर्षी प्रारंभीच ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर रोगराईचे संकट पसरले आहे. दूषित वातावरणामुळे मात्र गहू, हरभरा, कांदा तसेच पालेभाज्या पिकांवर मावा, थ्रिप्स, अळीचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यासोबत अवकाळीची संक्रात मानगुटीवर बसते की काय, याचा धसका शेतकरी वर्गाने घेतला आहे. … Read more

Ahmednagar News : पारनेर तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवारी पारनेर तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर पारनेर तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने जनजीव ठप्प झाले होते तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात गहू व ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढणीत आसतात, आशात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर … Read more

ऐन थंडीमध्ये पुण्यात दिवसभर पाऊस

Maharashtra News

Maharashtra News : ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात मंगळवारी (दि.९) दिवसभर रिमझिम पाऊस पडला. शहरासह उपनगरातही पावसाने हजेरी लावली. तसेच शहरावर धुक्याची दुलईही पाहायला मिळाली. आजही (दि.१०) शहरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शहरात किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून आले. उत्तरेकडून थंड वारे शहराच्या दिशेने वाहत आहेत. त्यातच … Read more

Horoscope Today : आजचे राशिभविष्य ! तूळ राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज

Horoscope Today

Horoscope Today : हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा-जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा ज्योतिषशास्त्राचा वापर केला जातो. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आज 10 जानेवारी ग्रहांच्या स्थितीनुसार तुमचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेऊया. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. भौतिक सुखसोयी वाढतील. … Read more

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा, शेतकरी संघटनेची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारने दुष्काळ्सास्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याविरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले. त्यामुळे सहकार अधिनियमातील कलम ७९ अ मधील तरतुदीच्या उल्लंघनामुळे संचालक मंडळाला बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने नाशिकच्या विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा निर्णय वादात सापडला आहे. या … Read more

साईचरणी २९ लाखांचा सुवर्णमुकुट अर्पण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या येथील श्री साईबाबांच्या झोळीत सोने, चांदी, रत्नजडित हिरे, रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल मंगळवारी (दि. ९) बंगळुरू येथील दानशूर साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी सुमारे २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांच्या शिरपेचात आतापर्यंत … Read more

Ahmednagar News : मोटारसायकलने धडक दिल्याने युवक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या तीन युवकांना मोटारसायकलने धडक दिल्याने अनिकेत महादेव अकोलकर हा जागीच ठार झाला तर फुलारी व चितळे हे दोघे गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना शेवगाव रोडवर हॉटेल निवांत समोर घडली आहे. … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी नगर दक्षिणचा शरद पवारांकडून आढावा ! ढाकणे, तनपुरे की लंके? तुम्हीच पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी आपल्या पद्धतीने राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली असून त्यानुसार उमेदवारांसाठी आढावा घेतला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेची जागा मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. याचे कारण विखे यांना फाईट कोण देणार यावरून राष्ट्रवादीत सुरु असणारी चर्चा. राष्ट्रवादीकडून यासाठी विविध नावे समोर आणली जात आहेत. दरम्यान आता ८ जानेवारीला याबाबत … Read more

Ahmednagar News : नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना मोक्का न्यायालयाकडून पोलिस कोठडी, पोलीस कस्टडी देण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यात गाजले होते. यातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे कोठडीत होता. दरम्यान त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला. आता आरोपी स्वप्निल शिंदे याच्यासह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. या आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी राहील. नगरसेवक शिंदे, सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास … Read more

वातावरणात पुन्हा बदल ! अवकाळी पाऊस सोबतच कडाक्याची थंडी, मान्सून संपल्यानंतर ७० पैकी १४ दिवस अवकाळी पाऊस, पिकांसह आरोग्यावरही ‘संक्रांत’

Weather News

Weather News : यंदा हवामान वर्षभर विषम राहिले. पावसाळा असो की हिवाळा वातावरणात एकसारखेपणा राहिलाच नाही. तीनही ऋतूंवर हवामान बदलाचा परिणाम झालेला आहे. परतीचा पाऊस अर्थात मान्सून राज्यातून संपल्यानंतर आजपर्यंत साधारण ७० दिवस झाले आहेत. या ७० दिवसापैकी १४ दिवस नगर शहर व जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय. नोव्हेंबरमध्ये ९ दिवस, डिसेंबरमध्ये ३ दिवस, तर जानेवारीतही … Read more

सशस्त्र दरोडेखोर अन् पोलिसांत थरार सहाजण जेरबंद : तलवारी, मिरची पूडसह घातक शस्त्रे जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारी, लोखंडी टामी, मिरची पुड,नायलॉन दोरी अशी हत्यारे घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत अन् नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात रात्रीच्यावेळी नगर – सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात असलेल्या पारगाव फाट्याजवळ चांगलाच थरार रंगला होता. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता या दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. घातक शस्त्रे … Read more

Maharashtra Politics : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं ! त्यांना राष्ट्रवादीत पुन्हा स्थान नाही…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले बहुतांश नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेले आहेत. तरीही भाजपसोबत गेलेल्या अजित पवार आणि इतर नेत्यांना पक्षात पुन्हा स्थान दिले जाणार नाही. याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. बिल्कीस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा गुजरात सरकारने … Read more

हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात दोन दिवस रिक्षा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने लागु केलेल्या हिट ॲण्ड रन या कायद्याविरोधात देशभर वाहतूकदारांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. त्यातच आता जामखेड येथील रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्थेच्यावतीने या काद्याला विरोध करण्यासाठी दोन दिवस रिक्षा बंद ठेऊन सरकारचा निषेध केला आहे. या बाबत तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या बाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

अवकाळीने शेतकऱ्यांची काळजी वाढली पिकांवर रोगराई वाढून उत्पन्नात घट येण्याची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : वातावरणाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय सलग दोन वर्षांपासून तोट्यातच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना मंगळवारी पुन्हा पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. राज्यात दोन दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची … Read more

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाची एंट्री! आजही ह्या ठिकाणी पडणार पाउस…

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यात अनेक भागांत ढगाळ हवामान असून, मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान, बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत. तसेच राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत … Read more

रेल्वेच्या कामामुळे दहा दिवसांपासून ती १४ गावे तहानलेली दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : दौंड – मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या सुरु असलेल्या कामामुळे विळद (ता.नगर) येथील पुलाजवळ बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या योजनेवर असलेल्या १४ गावांचा पाणी पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. याबाबत जि.प.सदस्य संदेश कार्ले व डॉ.दिलीप पवार यांनी भर पावसात थेट विळदला जावून पाहणी करत रेल्वेच्या ठेकेदाराची भेट घेत येत्या दोन दिवसांत पाणी … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी / संपाच्या इशाऱ्यामुळे गुरूवारी कांदा लिलाव राहणार बंद…!

Ahmednagar News

Ahmednagar News : वाहतुकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव गुरुवारी (दि.११) बंद ठेवण्याचा निर्णय दि अहमदनगर फळफळावळ व आडत्यांचे असोसिएशनने घेतला आहे. तसे पत्र त्यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले असल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी आपला कांदा विक्रीसाठी नेप्ती उपबाजारात न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे व्यापाऱ्यांनी … Read more

आतापर्यंत भाविकांकडून साईबाबांना सोने, रत्नजडित हिऱ्यांचे एकूण १८ मुकुट अर्पण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या येथील श्री साईबाबांच्या झोळीत सोने, चांदी, रत्नजडित हिरे, रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बंगळुरू येथील साईभक्त डॉ.राजाराम कोटा यांनी सुमारे २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांना सोने, रत्नजडित हिऱ्यांचे १८ मुकुट अर्पण केले आहेत. … Read more